भारतात एकूण लोकसंख्येच्या केवळ १ टक्का नागरिकच करदाते असून त्यातील केवळ ५४३० नागरिक वर्षाला १ कोटीपेक्षा अधिक कर भरतात असे सरकारच्या पारदर्शकता अभियानाअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. सरकारने या अभियानाअंतर्गत गेल्या १५ वर्षातली प्रत्यक्ष कर आकडेवारी जाहीर केली आहे.
भारतात लोकसंख्येच्या १ टक्काच करदाते
या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येपैकी २.८७ कोटी नागरिक आयकर रिटर्न भरतात मात्र त्यातील १.६२ कोटी कर भरत नाहीत. २०१२-१३ तील ही आकडेवारी आहे. त्यावेळी भारताची लोकसंख्या १२३ कोटी होती म्हणजेच लोकसंख्येच्या १ टक्का लोकच करदाते होते. या करदात्यांपैकी १.११ कोटी लोक वर्षाला दीड लाखांपेक्षाही कमी कर भरणारे आहेत तर १०० ते ५०० कोटी रूपयांदरम्यान कर भरणारे केवळ ३ जण होते. त्यांच्याकडून मिळालेल्या करापोटी सरकारला ४३७ कोटी रूपये मिळाले. १ ते ५ कोटी दरम्यान कर भरणार्यां ची संख्या ५ हजार असून त्यांच्याकडून करापोटी एकूण ८९०७ कोटी रूपये सरकारला मिळाले होते.
२०१५-१६ पर्यंत सरकारच्या कर महसूलात ९ पटीने वाढ झाली आहे व यातून सरकारला २.८६ लाख कोटींचा कर मिळाला आहे.