चहाच्या बायप्रॉडक्टपासून बनणार कपडे, चप्पल

tea
चहा हा प्रामुख्याने पेय म्हणून वापरात असला तरी आता चहा फॅशन क्षेत्रासाठीही वापरात येणार आहे. आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी चहाच्या बाय प्रॉडक्टपासून चामड्यासारखा कपडा तयार केला आहे. त्यातून कपडे,चपला, हँडबॅग अशा वस्तू बनू शकतात शिवाय या वस्तू पर्यावरणपूरकही आहेत असा वैज्ञानिकांचा दावा आहे.

विशेष म्हणजे हा कपडा जैविक पद्धतीने आपोआपच विघटित होतो. त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होत नाही.या कपडा चहाच्या सेल्यूलोज फायबरच्या मदतीने बनविला गेला आहे. त्यात बॅक्टेरिया व यिस्टची मदत घेतली गेली आहे. या प्रक्रियेतून बनलेला हा कपडा वाळला की चामड्यसारखा होतो. चहाच्या बाय प्रॉडक्टचा वापर यापूर्वी खाद्य व बायोमेडिकल क्षेत्रात केला गेला आहे. फॅशन क्षेत्रात मात्र त्यांचा वापर प्रथमच होणार आहे.

Leave a Comment