सर्वाधिक वेतन घेणा-या सीईओंच्या यादीत ३ भारतीय

trio
नवी दिल्ली – जगात सर्वाधिक वेतन घेणा-या पहिल्या १०० मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या (सीईओ) यादीत ३ भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश झाला आहे. या यादीमध्ये पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदा नुई, ल्योनडेसेबलचे भावेश पटेल आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांचा समावेश आहे. इंद्रा नुई आणि भावेश पटेल यांचा पहिल्या दहांमध्ये समावेश आहे. केमिकल कंपनी ल्योनडेसेबलचे भावेश पटेल या यादीत सहाव्या स्थानी आहेत. त्यांचे वार्षिक वेतन १६१.७ कोटी रुपये, तर इंद्रा नुई यांचे वार्षिक वेतन १४४.३ कोटी आहे. या यादीमध्ये त्या ८ व्या स्थानी आहेत. सत्या नडेला यांचे वार्षिक वेतन ११८.९५ कोटी रुपये असून ते २६ व्या स्थानी आहेत. अग्रस्थानी असणा-या मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या वेतनासंबंधीची माहिती इक्विलरच्या अहवालातून समोर आली आहे.

Leave a Comment