केवळ १ रुपयामध्ये खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन

samsung
नवी दिल्ली – इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या सॅमसंगने आपल्या ‘मेक फॉर इंडिया सेलिब्रेशन’ची घोषणा केली आहे. या ऑफरनुसार सॅमसंग कंपनी आपल्या अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट देत आहे.

सॅमसंगची ही ऑफर २९ एप्रिल ते १५ मे पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत ग्राहक या ऑफर्सचा फायदा घेवू शकतात. सॅमसंगने या ऑफरमध्ये ‘नो एक्स्ट्रा कॉस्ट’ या नावाची योजनाही सुरु केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहक केवळ १ रुपयामध्ये मोबाईल खरेदी करु शकतात आणि त्यानंतर १९ ईएमआय ऑप्शन्सने उर्वरित रक्कम भरु शकणार आहेत. ‘मेक फॉर इंडिया’ या सेलिब्रेशन ऑफर अंतर्गत गॅलेक्सी एस६ हा स्मार्टफोन ३३ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर गॅलेक्सी नोट ५ हा स्मार्टफोन ४२ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सवर ग्राहकांना १० टक्के कॅशबॅक ऑफर्सही मिळणार आहेत. तसेच हे स्मार्टफोन्स तुम्ही केवळ १ रुपयामध्येही खरेदी करु शकता आणि त्यानंतर ३, ६, ९ आणि १२ महिन्यांच्या ईएमआयवरही खरेदी करु शकता.

या ऑफरमध्ये गॅलेक्सी ए७ हा स्मार्टफोन २९ हजार ९०० रुपयांमध्ये आणि गॅलेक्सी ए५ हा स्मार्टफोन २४ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. गॅलेक्सी ग्रँड प्राईम ४जी स्मार्टफोन ८ हजार २५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगने या स्मार्टफोन्स सोबतच इतरही वस्तु म्हणजेच टीव्ही, एसी, टॅबलेटवर अनेक ऑफर्स दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तु किंवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्वरा करा. ही ऑफर १५ मेपर्यंत सुरु राहणार आहे.

1 thought on “केवळ १ रुपयामध्ये खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन”

Leave a Comment