अॅपलचा ‘आयफोन SE’ झाला स्वस्त!

iphone
मुंबई : अनेक दिवसांपासून मोबाईलप्रेमी अॅपलच्या ज्या बहुचर्चित ‘आयफोन SE’ वाट पाहत होते तो फोन मार्च महिन्यात अॅपलने लॉन्च केला. मात्र, या आयफोनच्या भारतातील किंमतीने अनेकांची निराशा झाली. अॅपल कंपनीने आयफोनप्रेमींना खुशखबर दिली आहे. अॅपलने पहिल्यांदाच ‘आयफोन SE’च्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

‘आयफोन SE’ची भारतीय बाजारपेठेत ३९ हजार एवढी किंमत रुपये होती. मात्र आता अॅपलने किंमतीत कपात करत ऑफर जाहीर केली आहे. पेटीएम या ऑनलाईन रिटेलरवरुन ‘आयफोन SE’चे १६ जीबी रोझ-गोल्ड व्हेरिएंट खरेदी केल्यास ३ हजार रुपयांचे कॅशबॅक आणि काही सवलतही मिळणार आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना A3K कूपन कोडचा वापर करावा लागणार आहे. कॅशबॅकची रक्कम पेटीएम वॉलेटमध्ये मिळेल, अशी माहिती अॅपलकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment