स्टाईलीश हँडबॅग हवी खरी, पण काळजी घेऊन करा खरेदी

style
ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड प्रचंड वेगाने लोकप्रिय होत आहे. महिला वर्गाची आवडती व अत्यंत जिवाभावाची हँडबॅग अथवा पर्स खरेदी करतानाही ऑनलाईन शॉपिंगचा वापर सर्रास केला जात आहे. महिलांच्या या पर्समध्ये विश्वरूप दर्शन होते अशी चेष्टा पुरूष वर्गाकडून नेहमीच केली जाते मात्र तरीही महिलांसाठी पर्स म्हणजे त्यांची जिवलग सखीच असते. त्यात आघाडीच्या अभिनेत्री नामवंत ब्रँडच्या हँडबॅगच्या जाहिराती करतात व त्यातून हँडबँग म्हणजे स्टाईल आयकॉनही बनली आहे.

परिणामी एकाच हँडबॅगवर अथवा पर्सवर महिला, युवतींचे भागत नाही. विविध प्रसंग, विविध पोशाख, प्रवास, आऊटिंग, समारंभ, पार्ट्या अशा ठिकाणी वापरता येतील अशा विविध स्टाईलच्या हँडबॅग त्यामुळे त्यांना संग्रही ठेवणे भाग पडते. दरवेळी दुकानांत जाणे जमतेच असे नाही मग ऑनलाईन खरेदीचा आधार घेतला जातो. ऑनलाईन हँडबॅग खरेदी करताना ही काळजी घेतली तर ही खरेदीही मनासारखी नक्कीच होऊ शकते.

handbags
हँडबॅग ऑनलाईन खरेदी करताना संबंधित साईटवरची माहिती म्हणजे वजन, आकार जरूर लक्षात घ्यायला हवा. जादा सामान नेण्यासाठी तिचा वापर होणार असेल तर ती आकाराने मोठी हवी मात्र जास्त वजनदांर असू नये अन्यथा खांदे दुखून येतात. म्हणजे हँडबॅग मोठी असेल पण बरोबर वागविताला सोपी व उपयुक्त आहे ना याची खात्री करून घ्यावी. ऑनलाईन शॉपिंगमध्ये हँडबॅग किती आरामदायी आहे हे कळू शकत नाही. मात्र अशा वेळी तिचे पट्टे, हँडल्स जरूर निरखा.

हँडबॅग वापराबाबतच्या सूचना तसेच तिच्या साफसफाईसंदर्भातली माहितीही जरूर जाणून घ्या. गॅरंटी ऑफर किती आहे हे तपासा. ब्रँडेड कंपन्यांच्या हँडबॅग महाग असतात व कांही कंपन्या या र्ब्रंडेड बॅग्जची सहीसही नक्कल करून त्या कमी किमतीत विकतात. येथे आपली फसवणुक होण्याची शक्यता मोठी असते त्यामुळे अशी खरेदी करताना संबंधित ब्रँडचा लोगो, झिप, शिलाई, कापड कोणते अशी सर्व माहिती जाणून घ्या व मगच खरेदी करा. आपली हँडबॅग स्टाईल आयकॉन असावी असे वाटण्यात चूक नाही पण ती खरोखरच उपयुक्त आहे ना हेही तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या.

Leave a Comment