विज्ञान शाखांमध्ये क्रांतिकारी बदल सुचवणारे संशोधन

oak
वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी पाण्याच्या रेणूची नवीन अवस्था शोधली असून, त्यात एका भारतीय वंशाच्या संशोधकाचा समावेश आहे. पाण्याच्या रेणूचे हे वर्तन घन, द्रव व वायू या तीनही अवस्थांपेक्षा वेगळे आहे. अमेरिकेच्या ओक रीज नॅशनल प्रयोगशाळेत हे संशोधन झाले असून, त्यात पाण्याची नवी अवस्था लक्षात आली. एका अष्टकोनी पण ५ अँगस्ट्रोमच्या मार्गिकेतून जाताना ती तयार झाली. यात अँगस्ट्रोम हे एका मीटरच्या दहा अब्जांश इतके माप असते. साधारणपणे अणूही केवळ एक अँगस्ट्रो व्यासाचे असतात.

ओक रीज राष्ट्रीय प्रयोगशाळेत तसेच ब्रिटनमधील रुदरफोर्ड अपलटन प्रयोगशाळा येथे हे प्रयोग करण्यात आले असून त्यात पाणी हे जेव्हा खडक, पेशी व मातीच्या अरुंद माश्गकेत असते तेव्हा त्याच्या काय अवस्था असतात, यावर प्रकाश पडला असून, विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांत त्यामुळे परिणाम होणार आहेत. अगदी कमी तापमानाला जेव्हा पाणी या माश्गकातून जाते तेव्हा त्याची पूंज गती दोन भित्ती विभागताना दिसते, जे आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्याला कधीच समजू शकत नाही, असे या संशोधन निबंधाचे लेखक ओक रीज नॅशनल प्रयोगशाळेच्या रासायनिक व अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक अलेक्झांडर कोलेसनिकोव यांनी म्हटले आहे. याचा अर्थ पाण्याच्या रेणूतील ऑक्सिजन व हायड्रोजन अणू स्थानभ्रष्ट होतात व त्यामुळे ते एकाच वेळी सहा सममिती अवस्थांमध्ये एकाच माश्गकेत एकाच वेळी असतात. असे फक्त पूंज भौतिकीत घडू शकते त्याचा दैनंदिन जीवनात कुठलाही अनुभव आतापर्यंत आला नव्हता असे कोलेशनिकोव यांनी सांगितले. अरुंद बोगद्यासारख्या माश्गकेत पाण्याची अवस्था वेगळी असते, असा याचा अर्थ आहे, त्यामुळे उष्मागतिकीचे नियम बदलू शकतात. अतिशय बंदिस्त वातावरणात पाण्याचे आचरण वेगळे असते ते समजेल, शिवाय पेशीभित्तीकांमध्ये पाण्याचे गुणधर्म व कार्बन नॅनोट्यूबमधील वर्तन समजू शकेल. भूगर्भशास्त्रीय पातळीवर खडकात पाण्याची अवस्था काय असते हे समजण्यास मदत होईल.

Leave a Comment