लावा’चे २ नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच

lava
नवी दिल्ली : आपले २ नवीन स्मार्टफोन ए ७२ आणि ए ७५ भारतीय मोबाईल फोन उत्पादक कंपनी ‘लावा’ने लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आले आहे. तसेच कंपनीने यात अँड्राईड मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीमचे अपडेट देणार असल्याचेही म्हटले आहे.

ए ७२ – किंमत : ६,४९९/-
यात १.५ GHz क्वाडकोअर प्रोसेसरसह १ जीबी रॅम तसेच ८ जीबीची इंटर्नल मेमरी देखील देण्यात आली आहे. यात ५ मेगा पिक्सलचा रिअर आणि फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २५०० mAh एवढी आहे. त्याचबरोबर ४ जी, वायफाय, ब्ल्यूटूथ, मायक्रो युएसबी अशा कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत.

ए ७६ – किंमत : ५,६९९/-
यात १.५ GHz क्वाडकोअर प्रोसेसरसह १ जीबी रॅम तसेच ८ जीबीची इंटर्नल मेमरी देखील देण्यात आली आहे. यात ५ मेगा पिक्सलचा फ्रंट आणि रिअर VGA कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता १८५० mAh एवढी आहे. त्याचबरोबर ४ जी, वायफाय, ब्ल्यूटूथ, मायक्रो युएसबी अशा कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment