भारताची आधार योजना जागतिक बँकेतही गाजली

adhar
भारताची खास ओळख बनलेली आधार कार्ड योजना यशस्वी झाल्यामुळे तिचा जागतिक बँकेवरही प्रभाव पडला आहे. इतकेच नव्हे तर भारताच्या या योजनेच्या अनुभवांचा फायदा घेऊन आफ्रिकी महाद्विपासह अन्य देशांतही अशी योजना पोहोचविण्याच्या मार्गांचाही शोध घेतला जात आहे असे समजते. आधार योजनेचे प्रमुख संचालक डॉ.अजयभूषण पांडे यांनी ही माहिती दिली.

डॉ.पांडे जागतिक बँकेच्या बैठकीसाठी गेले असताना तेथे आधार योजनेचे खूपच कौतुक करण्यात आले असे सांगून ते म्हणाले या संदर्भात आमच्या अनेक बैठका झाल्या व त्यात आधार योजनेसंदर्भात चर्चा झाल्या. इतकेच नव्हे तर ज्या देशात अशीच योजना सुरू करण्याचा विचार आहे त्या देशांच्या प्रतिनिधींशीही पांडे यांनी चर्चा केली. तेथे पांडे यांचा सल्ला घेतला गेला.

पांडे म्हणाले सब्सिडी दिल्या जाणार्‍या योजनांसाठी आधार अत्यंत उपयुक्त ठरले असून त्यामुळे भारत सरकारचा पुष्कळ पैसा वाचला आहे. या योजनेमुळे १ अब्जांहून अधिक नागरिकांची ऑनलाईन ओळख निर्माण झाली असून प्रत्येक आधार कार्डासाठी येणारा खर्च १ डॉलरपेक्षाही कमी आहे. हे कार्ड कुठेही टोकनसारखे वापरता येते शिवाय यामुळे बँकींगही घराच्या दारात आले आहे. सब्सिडी हस्तांतरणात ही योजना फारच प्रभावशाली ठरली आहे. आफ्रिकी देशांसाठी ही योजना अत्यंत आकर्षक ठरेल व त्यामुळे सरकारचा पैसाही वाचू शकेल. सरकारी योजनांची प्रभावी अम्मलबजावणीही त्यामुळे शक्य होईल.

Leave a Comment