झुकेरबर्गच्या सुरक्षेवर कोट्यावधीचा खर्च

mark
न्यूयॉर्क – फेसबुकने आपला २०१३पासून आता पर्यंत फेसबुकचा सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग याच्या सुरक्षेवर १२.५ मिलियन डॉलर म्हण्जेच जवळपास ८३ कोटी खर्च केले आहेत. २०१५मध्ये कंपनीने त्याच्या सुरक्षेवर ४.२६ मिलियन डॉलर म्हणजेच २८ कोटी ३० लाख रुपये खर्च केले होते. अशी पहिलीच वेळ आहे कि कंपनीने याबाबतची माहिती दिली. याबाबत अमेरिकेच्या सिक्युरिटीज एंड एक्सचेंज कमीशनने मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्याच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चाचा तपशील मागतील होता.

रेग्युलिटरी फायलिंगच्या अनुसार, झुकेरबर्ग आमचे संस्थापक, चेअरमन आणि सीईओ आहेत. त्या कारणामुळे त्यांचे संरक्षण करण्याकरिता एवढा खर्च करण्यात आला. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सच्या अनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झुकेरबर्ग ८व्या स्थानावर आहे आणि त्यांची एकूण संपत्ती ४२ बिलियन डॉलर एवढी आहे.

Leave a Comment