ग्रेफीनपासून इलेक्टॉनिक पेपर तयार करण्यात यश

refin
चीनी संशोधकांनी प्रथमच ग्रेफीनपासून इलेक्ट्राॅनिक पेपर तयार करण्यात यश मिळविले असून तंत्रज्ञान क्षेत्रात ही मोठी सफलता मानली जात आहे. ज्ञात असलेल्या पदार्थात ग्रेफीन हे सर्वात मजबूत तरीही हलके मटेरियल आहे. शिवाय ते कार्बनपासून तयार होत असल्याने त्याचा उत्पादन खर्चही कमी आहे.

चीनच्या गुआंगझाऊ येथील ओईडी टक्नॉलॉजीजचे प्रमुख चेन यू यांनी अन्य एका कंपनीशी सहकार्यातून ग्रेफीनपासून इलेक्ट्राॅनिक पेपर तयार केला आहे. हा पेपर ०.३३५ नॅनोमीटर जाडीचा आहे व अत्यंत लवचिक आहे. सामान्य इलेक्ट्राॅनिक पेपरपेक्षाही तो खूपच लवचिक आहेच पण तो अधिक मजबूतही आहे. शिवाय नेहमीच्या इलेक्ट्राॅनिक पेपरपेक्षा त्याची डिस्प्ले गुणवत्ताही कितीतरी अधिक आहे. सामान्य इलेक्ट्राॅनिक पेपरमध्ये इडियम या मौल्यवान धातूचा वापर करावा लागतो त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च अधिक असतो. ग्रेफीन कार्बनपासून बनत असल्याचे त्याचा उत्पादन खर्च कमी येतो. १ वर्षभरात ग्रेफीन चे उत्पादन सुरू केले जात आहे व त्यापासून कडक व लवचिक डिस्प्ले बनविणे शक्य आहे असा संशोधकांचा दावा आहे. त्याचबरोबर ई रिडर्स व वेअरेबल गॅजेटस उत्पादनातही या पेपरच्या वापर शक्य होणार आहे.

Leave a Comment