पतंजली कोलगेट, नेस्लेला मागे टाकणार

patanjali
नवी दिल्ली : कोलगेट या आंतराष्ट्रीय कंपनीला पतंजली आयुर्वेद कंपनी एका वर्षाच्या आत आणि नेस्ले आणि युनिलिव्हर यांना पुढील काही वर्षात मागे टाकणार असल्याचे आव्हान योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा एफएमजीसी कंपन्यांना दिले आहे. पतंजलीने चालू आर्थिक वर्षात ५ हजार कोटींची उलाढाल केली आहे.

पतंजली चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कोलगेटला मागे टाकणार आहे. पतंजली कोलगेटचे ‘गेट’ बंद करणार आहे. यासह नेस्लेच्या कोटय़ातून (कंपनीचा लोगो) बसलेल्या चिमण्या उडून जातील. पॅटींनची पॅन्ट ओली होणार असून, युनिलिव्हरचे लिव्हर लवकरच खराब होईल, असे बाब रामदेवबाबा यांनी म्हटले आहे. रामदेव यांची पतंजली चालू वषात निर्यात आणि निर्यात क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. पतंजली १ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या माध्यमातून आसाम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाच ते सहा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. आम्ही अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, अफ्रिका आणि अरब देशांसह १०-१२ देशांमध्ये मध आणि सौंदर्य प्रसाधने यांची निर्यात करणार आहे.

Leave a Comment