पहिल्या तिमाहीत फेसबुकचा महसूल ५० टक्कयांनी वाढला

face
फेसबुकने पहिल्या तिमाहीत महसूलात तब्बल ५० टक्के वाढ नोंदविली असून हा महसूल ५.३८ अब्ज डॉलर्स म्हणजे ३५ हजार कोटींवर गेला आहे. या महसूलात मुख्य वाटा जाहिरातदारांचा आहे.फेसबुकवरील मोबाईल अॅप व लाईव्ह व्हिडीओने मोठ्या प्रमाणात जाहिरातदारांना अधिक खर्चासाठी प्रवृत्त करण्यात यश मिळविले आहे.

फेसबुकच्या महसूलातील मोठा हिस्सा मोबाईल जाहिरातींचा असून एकूण महसूलात त्यांचा वाटा ८२ टक्के आहे. जगात ३१ मार्चपर्यंत फेसबुकचे १.६५ अब्ज युजर नोंदले गेले आहेत. जाहिरातदारांनी टीव्ही पेक्षाही मोबाईल वेब प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीस प्राधान्य दिेले आहे. त्याचा सर्वाधिक फायदा फेसबुकला होत आहे.

फेसबुकच्या पहिल्या तिमाहीच्या रिझल्टचा परिणाम बुधवारी एक तासात फेसबुकचा शेअर ९.५ टक्कयांनी वाढण्यात झाला व हा शेअर ११८.३९ वर पोहोचला.

Leave a Comment