जीपची ट्रेलकॅट देणार कोणत्याही रस्त्यांना आव्हान

trailcat
जीपने त्यांची ट्रेलकॅट ही नवी कन्सेप्ट गाडी सादर केली असून ती जीपच्याच रँग्लर मॉडेलवर आधारित आहे. या वाहनाला असे जबरदस्त इंजिन दिले गेले आहे की कोणत्याही रस्त्यावर हे वाहन न थकता दमता मैलोनमैलांचा प्रवास करू शकेल.

प्रथम दर्शनी अॅडव्हेंचर वाहनासारखीच दिसणारी ट्रेलकॅट प्रत्यक्षातही चांगलीच मजबूत आहे. उखडवाखड रस्त्यांवरही सफाईदार चालण्यासाठी तिला मोठी चाके दिली गेली आहेत. ही चाके कोणत्याही रस्त्यांवर आपला ठसा नक्कीच उमटवतील असा कंपनीचा दावा आहे. या गाडीला व्ही ८ हेलकॅट इंजिन दिले असून ते ७०७ हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करू शकते. हे इंजिन सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने जोडलेले आहे. वाहनाला एलईडी हेडलँप व फॉग लँपही दिले गेले आहेत. डोम हूड व सस्पेन्शनसाठी फॉक्स शॉक अॅबझॉर्व्हर आहेत.

गाडीचा प्रवास प्रवाशांना आरामदायी आणि सुखकर व्हावा यासाठी बकेट सीटस दिल्या गेल्या आहेत. ६० किमीचा वेग ही गाडी ४.२ सेकंदात गाठते. हे वाहन प्रत्यक्षात बाजारात कधी येणार व त्याची किंमत किती असेल याची कोणतीही माहिती जाहीर केली गेलेली नाही.

Leave a Comment