इंडोनेशियाच्या मंत्र्याचा जावईशोध; विवाहीत महिलांमुळेच वाढतो भ्रष्टाचार

indonesia
नवी दिल्ली : भ्रष्टाचारासंबंधी एक अजब वक्तव्य इंडोनेशियाच्या एका मंत्र्यांने केले आहे. त्यांनी भ्रष्टाचारासाठी सरळ सरळ विवाहीत महिलांनाच जबाबदार धरले आहे.

हे वादग्रस्त वक्तव्य इंडोनेशियाचे धार्मिक मुद्यांचे मंत्री लुकमान हकीम सैफुद्दीन यांनी केले आहे. पत्नींच्या अनेक इच्छा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरुष भ्रष्टाचार करतात, असे त्यांनी म्हटले आहे. महिलांना डिझायनर कपडे, दागिने हवे असतात आणि हेच भ्रष्टाचाराचे मूळ कारण असल्याचा जावईशोध या मंत्री महोदयांनी लावला आहे. सोबतच, महिलांनी महागड्या गोष्टींची मागणी करू नये, त्यामुळे भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल, असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत. यावरून महिलांनी मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महिलांना जबाबदार ठरवणे, अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment