आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले अलीबाबाचे जॅक मा

alibaba
पेईचिंग – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती चीनची दिग्गज ऑनलाईन रिटेल कंपनी अलीबाबाचे अध्यक्ष जॅक मा बनले आहेत. त्यांनी वांडा ग्रुप कंपनीचे अध्यक्ष वांग जियानलीन यांना मागे टाकून प्रथम स्थान मिळविले आहे. कंपनीकडून सध्याच जाहीर करण्यात आलेल्या रकमेनंतर जॅक मा यांच्या आर्थिक स्थितीत बदल घडून आला आहे.

ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार जॅक मा यांची एकूण संपत्ती ३३.३ अब्ज डॉलर म्हणजे २,१७८ अब्ज रुपये आहे. जॅक मा यांनी वांग यांना पिछाडीवर टाकले आहे. वांग यांची संपत्ती सध्या ३२.७ अब्ज डॉलर आहे. तर हाँगकाँगचे ली का-शिंग २९.५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱया स्थानावर आहेत. असे असले तरी जॅक मा यांचे प्रथम स्थान तात्पुरते ठरण्याची शक्यता आहे. कारण वांग आपल्या एंटरटेनमेंट व्यवसायाला पुनर्गठित करत आहेत.

Leave a Comment