व्होडाफोनशी व्हिडिओकॉन डी २ एचचा करार

combo
मुंबई : व्हिडिओकॉन डी २ एच आणि व्होडाफोन एम-पेसा यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला असून या करारांतर्गत व्हिडिओकॉनच्या ग्राहकांना व्होडाफोन एम-पेसा वापरून त्यांच्या डी २ एच सेवा रिचार्ज करू शकता येणार आहे.

व्हिडिओकॉन डी २ एचची सेवा रखडलेली असल्यास १,२०,०००+ व्होडाफोन एम-पेसा रोखीने मात्र व्हिडिओकॉन डी २ एच रीचार्ज करता येणार नाही मात्र आपल्या मोबाईलवरून एम-पेसाच्या माध्यमातून रिचार्ज करता येणार आहे. अशा प्रकारे ग्राहकांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. व्हिडिओकॉन डी २ एच कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सौरभ धूत म्हणाले की, एम-पेसा डिजिटलचा वापर करून रिचार्ज सक्षम करण्यासाठी व्होडाफोन आणि आमच्या कंपनीमध्ये महत्त्वपूर्ण करार झाल्याचा आम्हाला आनंद आहे.

व्होडाफोन आऊटलेटस हे आमच्या ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या व्हिडिओकॉन डी २ एच रिचार्ज करण्यासाठी एक सोपा आणि शक्तिशाली मार्ग देईल. व्होडाफोन एम-पेसाचे बिझनेस हेड सुरेश सेठी म्हणाले की, व्हिडिओकॉन डी २ एच या करारानुसार आम्हाला सेवा देय असून एक सुरक्षित आणि सुविधाजनक मोड प्रदान करून व्हिडिओकॉन डी २ एच आणि व्होडाफोन सदस्य दोन्ही सेवा प्रदान करतील आणि आम्हाला खात्री आहे की व्हिडिओकॉन डी २ एच सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे डिजिटायझेशनचे आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यास वेळ लागणार नाही.

व्हिडिओकॉन डी २ एचचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल खेरा म्हणाले की, आमच्या ग्राहकांना नावीन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला खात्री आहे की, आमचे ग्राहक सुविधेचा तात्काळ लाभ घेतील.

Leave a Comment