येतेय अखंड चालणारी बॅटरी

nano-wire
कोणत्याही इलेक्ट्रीकल वा इलेक्टॉनिक गॅजेटसमध्ये बॅटरी हा महत्त्वाचा भाग असतो. बॅटरी म्हणजे त्या संबंधित गॅजेटचे लाईफच. अनेकदा या बॅटरी बदलाव्याही लागतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या एका चमूने कधीच बदलावी लागणार नाही अशी बॅटरी बनविली असून यामुळे बॅटरी क्षेत्रात क्रांती घडून येईल असा दावा केला जात आहे. ही बॅटरी नॅनो वायरवर आधारित आहे.

या संशोधनातील प्रमुख व पीएचडीची विद्यार्थीनी म्या ली थाई या संदर्भात माहिती देताना म्हणते, मानवी केसापेक्षाही हजार पट बारीक नॅनो वायरचा वापर यात केला गेला आहे. ही वायर इलेक्ट्राॅन स्टोरेज व ट्रान्स्फरला सपोर्ट करते मात्र ती नाजूक असल्याने पारंपारिक लिथियम बॅटरीमध्ये ती तुटण्याची शक्यता जास्त असते. ही वायर अधिक मजबूत बनविण्यासाठी गोल्ड नॅनो वायरला आम्ही मँगनीज डाय ऑक्साईडचे कोटिंग दिले व त्यावर प्लेक्सीग्लॅक्ससारख्या जेलची कोटिगही दिली. संशोधनात असे दिसले की जेलची हजार कोटिंग चढविली तरी नॅनो वायरच्या कपॅसिटीवर कोणताही परिणाम झाला नाही.

अशा प्रकारे तयार झालेली नवी बॅटरी तीन महिन्यात २ लाखांहून अधिक वेळा टेस्ट केली मात्र तरीही नॅनो वायरच्या क्षमतेत कोणताही परिणाम दिसला नाही.त्यामुळे अशी बॅटरी गॅजेट मध्ये वापरली तर ती बदलण्याची वेळ कधीच येणार नाही. ही बॅटरी कार, विमाने आणि अन्य गॅजेटसमध्येही सहज वापरता येणार आहे.

Leave a Comment