
श्रीहरीकोट्टा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) देशातील विविध स्थानांची नेमकी माहिती पुरविण्याच्या उद्देशाने पीएसएलव्ही-सी३३ ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने आयआरएनएसएस-१जी या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. नौकानयन (नेव्हिगेशन) करणारा हा भारताचा या मालिकेतील सातवा आणि शेवटचा उपग्रह आहे.
भारताचा सातवा ‘आयआरएनएसएस-१जी’ उपग्रह अवकाशात
आज (गुरुवार) चार स्तर असलेल्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाने आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोट्टा या बेटावरून १२ वाजून ५० मिनिटांनी सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोच्या या मोहिमेचे ‘काउंटडाऊन‘ मंगळवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुरू झाले. या उपग्रहावर दोन नौकानयन व रेंजिंगची यंत्रणा असून, त्याचे जीवनामान बारा वर्षे आहे.
