पुरुषांचा ‘सेक्स ड्राईव्ह’ कमी होत चालला

sex-drive
नवी दिल्ली : एका संशोधनात शारिरीक संबंध ठेवण्यात महिलांच्या तुलनेत पुरुष लवकर कमजोर पडत असल्याचे समोर आले आहे. ही एखाद्या देशातील पुरुषांची समस्या नसून संपूर्ण जगाची समस्या बनल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

पुरुषांचा ‘सेक्स ड्राईव्ह’ (सेक्सची इच्छा नसणे किंवा शारीरिक भूक कमी) कमी होत चालली आहे. प्रत्येक पुरुष कायम सेक्सबाबत विचार करीत असतो. तसेच प्रेम करण्यास व स्वीकारण्यास तो कधीही तयार असल्याचे म्हटले जाते. मात्र, नुकत्याच केलेल्या ऑनलाइन पाहणीत आढळून आले आहे की, ६२ टक्के पुरुष आपल्या महिला पार्टनरच्या तुलनेत सेक्स करण्याबाबत मागे राहतात. ही पाहणी ‘यूकेमेडिक्स डॉट कॉम फार्मसी’ ने केली होती. या पाहणीतील प्रत्येक तिस‍-या पुरुषाने सांगितले की, दिवसेंदिवस त्याचा ‘सेक्स ड्राईव्ह’ कमी होत चालला आहे.

ब्रिटनमधील कामसंबंधातील विशेषतज्ज्ञ डॉ. डेविड एडवड्र्स यांच्या माहितीनुसार, सेक्स ड्राईव्ह कमी झाल्यास एका व्यक्तीचे सामान्य जीवन व त्याचे नातेसंबंध धोकादायक स्थितीत पोहोचतात. डेविड म्हणतात, माझ्याकडे अनेक पुरुष सेक्सच्या समस्येमुळे येतात. नुकतेच माझ्याकडे एक केस आली होती. ज्यात संबंधित पुरुषाला सेक्समध्ये रस नसल्याने त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला. संबंधित महिला त्याला मागील १२ वर्षापासून डॉक्टरांची मदत घेण्यास सांगत होती. मात्र त्याने पत्नीचे ऐकले नाही अखेर ती त्याला सोडून गेल्यानंतर त्याला जाग आली. दरम्यान, जगभरातील पुरुषांचे दिवस आता भरत आल्याचे एका संशोधनात पुढे आले आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिला वैज्ञानि‍काने दावा केला आहे की, पुरुषांची प्रजात जास्त दिवस या जगात टिकणार नाही. येत्या ५० लाख वर्षांत पुरुष प्रजात पृथ्‍वीवरून नष्ट होईल. या महि‍ला वैज्ञानि‍काने हा ही दावा हकेला आहे की, पुरुष प्रजात नष्ट होण्याला सुरुवात झाली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment