उस्मानाबादचा अवलिया फेसबुकद्वारे कमावतो प्रतिमहिना ९० हजार

FACEBOOK
उस्मानाबाद : दुष्काळाने अनेक तरूणांची स्वप्न खाक झाली असताना; उस्मानाबादमधील कळंब शहरातल्या एका तरूणाने मात्र अनोखी किमया केली आहे. त्याने पैसा कमवण्यासाठी फेसबुकचा वापर केला. फेसबुकच्या माध्यमातून त्याला आज रोजी महिनाकाठी ९० हजार रूपये इतकी घसघशीत कमाई होते आहे. या तरूणाचे नाव मोहित कोलंगडे असे आहे.

अद्याप वयाची विशीही पूर्ण न केलेला हा तरूण सध्या अनेक तरूणांपूढे एक रोल मॉडेल ठरत आहे. कारण महिन्याकाठी त्याला होत असलेली ९० हजारांची घसघशीत कमाई. होय, हे स्वप्न नव्हे तर सत्य आहे. मोहित कोलंगडेची तीन वेगवेगळी फेसबुक पेजेस आहेत. ‘आईच्या गावात बाराच्या भावात’, ‘इंजिनिअरींग फंडा’, आणि ‘विश्वास नांगरे पाटील फॅन्स’. रोज पाच तास लॅपटॉपवर बसून मोहित फेसबुक पेजेस मॅनेज करतो. कधी कळंबमधून, तर कधी लातूरातून.

त्याने या फेसबुक पेजच्या माध्यमातूनच एक नवा इतिहास रचला आहे. मोहित सध्या स्वत:ची कमाई स्वत: करतो. त्याच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी तो घरच्यांवर अजिबात अवलंबून नाही. इंजिनिअरिंग ड्रॉप आऊट असलेल्या मोहितने फेसबुक पेजेसवरुन वेबसाईट्स, न्यूज मीडिया, अँड्रॉईड अॅप्लिकेशन्स प्रमोट करुन फेसबुकच्या कमाईतून घर बांधायला घेतले आहे. जे येत्या काळात महाराष्ट्रातले पहिले फेसबुक हाऊस म्हणून ओळखले जाईल.

मोहितचे खरे भांडवल फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केल्या जाणाऱ्या पोस्ट आणि त्याला मिळणाऱ्या लाईक्स, कमेंट हे आहे. २०१० नंतरमोहितचा हा व्यवसाय सुरू झाला. व्यवसाय म्हणण्यापेक्षा तो त्याचा छंद आहे. हळूहळू त्याचे व्यवसायात पदार्पण झाले. त्याच्या तीनपैकी दोन फेसबुक पेजवरून तो केवळ विनोदी (फनी) पोस्ट, फोटो व्हिडिओ शेअर करतो. तर, विस्वास नांगरे पाटील फॅन्स पेजवरून तो तरूणांना प्रात्साहन मिळेल असे संदेश पोस्ट करत असतो. इतर दोन पेजवरून पोस्ट होणाऱ्या पोस्टमध्ये हिंदी-इंग्रजीतून विनोदी ढंगात भाषांतरीत केलेले जोक्स, मराठीतल्या कलाकारांचे फनी एडीटेज फोटोज, फनी व्हिडिओज यावर अपलोड होतात.

सुरूवातील या पेजेसला फार लाईक नव्हते. मात्र,२०१२ नंतर त्याच्या पेजच्या लाईक जोरात वाढल्या. मोहितने २०१२ नंतर पेजेसचा वापर वेगवेगळ्या वेब साईटला, न्यूज मिडीयाला प्रमोट करण्यासाठी केला. त्यातून मोहितला महिन्याला ९० हजारापर्यंत उत्पन्न मिळाले.

मोहित हा एक विशीतली तरूण आहे. तो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरींगचा ड्रॉप आऊट आहे. यंदा तो लातूरला कायद्याच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत आहे. विशेष म्हणजे तो नक्की काय करतो हे त्याच्या आईवडीलांना माहित नाही. मात्र, तो आर्थीकदृष्ट्य कुणावरही अवलंबून नाही. याचा त्याच्या घरच्यांना विशेष अभिमान आहे. मोहितचे वडिल कळंब कोर्टात कारकून आहेत. आपल्या कमाईतून त्याने वडिलांना घर बांधण्यासाठी १० लाख रूपये दिले आहेत. तसेच बहिणीची एमएची परीक्षा फी भरली आहे.

मोहितची फेसबुक पेज आणि त्याचे लाईक्स
आईच्या गावात बाराच्या भावात – ४ लाख ८२ हजार
इंजिनिअरिंग फंडा – ४ लाख २० हजार
विश्वास नांगरे पाटील फॅन्स – अडीच लाख

Leave a Comment