स्नॅपडीलपेक्षा सरस ठरली अॅमेझॉन

amazon
बंगळुरु: मार्च महिन्यातील ई कॉमर्स क्षेत्रासंदर्भातील ताज्या आकडेवारीनुसार, अॅमेझॉन इंडिया या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी स्नॅपडीलला मागे टाकत सर्वाधिक उत्पादनांची विक्री करणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे. फ्लिपकार्टचे अद्यापही पहिल्या क्रमांकावर वर्चस्व कायम असल्यामुळे परदेशातील अॅमेझॉनचे भारतीय बाजारपेठेत वाढणारे महत्त्व अधोरेखित होत आहे.

गेल्या महिन्यात फ्लिपकार्टची बाजारपेठेत ३७ टक्के हिस्सेदारी होती. परंतू मार्च २०१५च्या तुलनेत कंपनीच्या बाजारपेठेतील घट झाली आहे. त्यावेळी फ्लिपकार्टची ऑनलाईन बाजारपेठेतील हिस्सेदारी ४३ टक्के होती. त्याचप्रमाणे स्नॅपडीलची हिस्सेदारीदेखील गेल्यावर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवर पोहचली आहे. परंतू अॅमेझॉन इंडियाची बाजारपेठेतील हिस्सेदारी गेल्यावर्षीच्या १४ टक्क्यांवरुन २१ ते २४ टक्क्यांदरम्यान पोहचली आहे. कंपनीने प्रतिस्पर्ध्यांची १० टक्के हिस्सेदारी काबीज केली आहे, अशी माहिती एका संशोधन संस्थेच्या अहवालानुसार समोर आली आहे.

गेल्या महिन्यात ऑनलाईन किरकोळ विक्री करणाऱ्या कंपन्यांनी दिवसाला ८ ते ९ लाख वस्तूंचे वितरण केले आहे. त्यापैकी तीन चतुर्थांश हिस्सेदारी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन व स्नॅपडीलची होती. त्यानंतर शॉपक्लूज आणि पेटीएमचा नंबर लागतो.

Leave a Comment