मुंबई : नेहमीच आपल्या सॉफ्टवेयर आणि डिव्हाइसमुळे अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट चर्चेत असते. लूमिया स्मार्टफोनला मायक्रोसॉफ्टने बाजारात आणले आहे. आपले वर्चस्व बाजारात प्रस्थापित करण्यासाठी कंपनीने लूमिया स्मार्टफोन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत मिळतो आहे लुमिया ९५०
माइक्रोसॉफ्ट कंपनीच्या स्टोरमधून लुमिया ९५०XL जर खरेदी केला तर त्यावर एक लुमिया ९५० हा मोबाईल मोफत देणार आहे. माइक्रोसॉफ्ट स्टोरवर ९५०XL हा मोबाईल ४३,६०१ रुपयांना तर लुमिया ९५०ची किंमत ३६,४८६ रुपये आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिलेल्या या ऑफरमुळे कंपनी लूमिया स्मार्टफोनचा बिझनेस संपवण्याच्या विचारात असल्याचे दिसत आहे. मायक्रोसॉफ्ट पुढच्या वर्षी सर्फेस स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
Nice pic