अॅपलच्या मॅकबुकची वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपली असून अॅपलने १२ इंच स्क्रीनवाला नवा मॅकबुक लाँच केला आहे. खुपच पातळ आणि वजनाने हलका असलेला मॅकबुक रोझ (गुलाबी) गोल्ड रंगात लाँच केला आहे. अॅपलने या मॅकबुक २०१६ मध्ये काही नवीन फिचर्स तर दिले नाहीत.
नव्या फिचर्ससह अॅपलने लाँच केला मॅकबुक
हा मॅकबुक लोकांच्या पसंतीस उतरेल असा दावा कंपनीने केला आहे. यात इंटेल कोर एम३ प्रोसेसर दिला गेला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा प्रोसेसिंग स्पीड २०१५च्या मॅकबुकच्या तुलनेत जास्त असेल. मॅकबुकच्या बॅटरीची लाईफ १० ते १२ तासाची आहे. त्याचबरोबर यात १२ इंच ऐज-टू-ऐज रेटिना डिस्पले दिला गेला आहे. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी स्टोरेज देण्यात आले आहे. एंट्री लेव्हल मॅकबुकची किंमत १,९९९ डॉलर म्हणजेच ८५,९९० एवढी असू शकते.