जगातील सुंदर नोटेची मानकरी ठरली न्यूझीलंडची नोट

newziland
जगभरातील चलनी नोटांच्या ब्युटी काँपिटीशन मध्ये यंदा जगतसुंदरीचा मान न्यूझीलंडच्या ५ डॉलरच्या नोटेला मिळाला आहे. इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी तर्फे दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित केली जाते. २६ एप्रिल २०१६ रोजी या संदर्भातला निकाल जाहीर करण्यात आला. यात ३० देशांनी भाग घेतला होता. भारतानेही या स्पर्धेत भाग घेतला होता पण आपले चलन टॉप ३० मध्ये येऊ शकले नाही.

न्यूझीलंडच्या पाच डॉलरच्या नोटेने बँकनोट ऑफ द इयर हा सन्मान पटकावला. त्यात तिने स्वीडनच्या २० क्रोनोर नोटेला तसेच रशियाच्या १०० रूबल्स, कजाकिस्तानच्या २० हजार रेंगे, स्कॉटलंडच्या पाच पौंड नोटेला मागे टाकले. न्यूझीलंडची ही विजेती नोट ऑरेंज कलरची असून तिच्यावर गिर्यारोहक एडमंड हिलरी यांची प्रतिमा आहे. दुसर्‍या बाजूला पिवळ्या डोळ्यांच्या पेंग्विनची प्रतिमा आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन के यांनी आक्टोबर १५ मध्ये ५ व १० डॉलरच्या नोटा जारी केल्या होत्या. या नोटांची छपाई व डिझाईन कॅनडात करण्यात आले आहे. नोटेची निवड २००० सदस्य असलेल्या पॅनलच्या मतदानातून करण्यात आली.

Leave a Comment