चालू वर्षात साखर आयात जाणार १०० टक्कयांवर

sugar
दिल्ली- चालू वित्तवर्षात सरकारला साखर आयात १०० टक्कयांवर न्यावी लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेली कांही वर्षे पाठोपाठ दुष्काळ असल्याने सिंचन क्षमतेवर परिणाम झाला आहे व त्यामुळे उसाच्या उत्पादनातही घट झाली आहे. देशातील सर्वाधिक साखर उत्पादन करणार्याच महाराष्ट्रात यंदा उसाच्या उत्पादनात ४० टक्के घट झाली आहे. गेल्या चार वर्षात प्रथमच भारताला १०० ट्क्के साखर आयात करण्याची पाळी आली असल्याचेही सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे सध्या जागतिक बाजारपेठेत साखरचे दर चढे आहेत. त्यातच भारताची मागणी वाढली तर आणखी दरवाढीची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ब्राझील, पाकिस्तान, थायलंड या देशांना निर्यात वाढवून कमाईची चांगली संधी मिळणार आहे. मुंबई साखर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले, यंदा उत्पादनात घट आहे त्यामुळे पुढच्या वर्षातही साखर आयात करावी लागणार आहे. दुष्काळामुळे उसाची लागवड झालेली नाही. देशात सात वर्षात प्रथमच साखरेचे उत्पादन देशाच्या गरजेपेक्षा कमी होणार आहे.

Leave a Comment