मोटोरोलाने भारतात लॉन्च केले ३६० स्पोर्ट स्मार्टवॉच

smartphone
मुंबई – भारतात मोटोरोलाने मोटो ३६० स्पोर्ट स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. याची किंमत १९,९९९ एवढी ठेवण्यात आली असून हे स्मार्टवॉच अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही डिव्हाइसला सपोर्ट करते.

दरम्यान मोटोरोलाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अॅथलीट आणि फिटनेस शौकिन लोकांना ध्यानात ठेवून मोटो ३६० स्पोर्टला लॉन्च केले होते. या स्मार्टवॉचचे वैशिष्टय म्हणजे यात आलेले मॅसेज आणि नोटिफिकेशन तुम्ही लख्ख सूर्यप्रकाशात देखील वाचू शकता. एनीलाइट हाइब्रिड डिस्प्लेमुळे हे संभव झाले आहे. मोटो ३६० स्‍मार्टवॉचची बॉडी सिलिकॉनपासून बनवण्यात आल्यामुळे हे स्मार्टवॉच पूर्णतः वॉटरप्रूफ आहे. या स्मार्टवॉचचे एक वैशिष्टय म्हणजे आजूबाजूच्या प्रकाशानुसार याची स्क्रीनचे ब्राईटनेस आपोआप कमी-जास्त होते.

इनबिल्ट जीपीएस – मोटो ३६० स्पोर्ट स्‍मार्टवॉचमध्ये इनबिल्ट जीपीएस आहे.

बॅटरी – याची बॅटरी एक वेळ फुल चार्ज केल्यानंतर सलग दोन दिवस काम करते.

स्क्रीन – अँड्रॉईड विअर मोटो ३६० स्पोर्टमध्ये १.३७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. स्क्रीनच्या रक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ देण्यात आले आहे.

प्रोसेसर – मोटो स्मार्टवॉचमध्ये १.२ गीगाहर्ट्सचा क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४०० प्रोसेसर आणि ५१२ एमबी रॅम देण्यात आले आहेत.

स्टोरेज – वॉचमध्ये ४ जीबीचे स्टोरेज आहे आणि ब्लूटूथद्वारा स्मार्टफोनशी कनेक्ट होऊ शकता.

Leave a Comment