१३ वर्षात पहिल्यांदाच ‘अॅपल’ची गटांगळी

apple
मुंबई : गेल्या १३ वर्षात पहिल्यांदाच मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलला झटका बसला आहे. अॅपलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीला १३ वर्षात पहिल्यांदाच तोटा झाला आहे. कंपनीच्या पहिल्या तिमाहीच्या कमाईत १३ टक्के घसरणीची नोंद झाली आहे. आयफोनच्या विक्रीत घट झाल्यामुळेच कंपनीवर ही वेळ आली आहे. दुसरीकडे अॅपलचे चीनमधील स्थान आणि विक्री याबाबत कंपनीला अतिविश्वास होता. त्याचाही परिणाम झाल्याची चर्चा व्याप्त आहे. आकडेवारीनुसार गेल्यावर्षी याच तिमाहीत अॅपलने ५८ अब्ज डॉलरची विक्री केली होती. यावर्षी यामध्ये घट होऊन ५० अब्ज डॉलर इतकी विक्री झाली आहे. अॅपलच्या विक्रीमध्ये २००३ नंतर पहिल्यांदाच घट नोंद झाली आहे.

Leave a Comment