शहाजहान उरूसात मूळ कबरी पर्यटकांसाठी होणार खुल्या

shahajahan
आग्रा- आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहालात मोगल बादशाह शहाजहान यांच्या उरूसाची तयारी सुरू असून दरवर्षी प्रमाणे हा ऊरूस ३ ते ५ मे या कालावधीत साजरा होत आहे. या काळात पर्यटकांना बाहशाह शहाजहान आणि त्यांची बेगम मुमताज मेहल यांच्या मूळ कबरी पाहण्याची संधी उपलब्ध होऊ शकणार आहे. या मूळ कबरी एरव्ही पर्यटकांना पाहता येत नाहीत.त्या ऐवजी मूळ घुमटाखाली असलेल्या प्रतिकृतीच पाहता येतात.

दरवर्षी उरूस काळात या मूळ कबरी उघडल्या जातात. उरूसाची सुरवात ३ मे रोजी दुपारी गुलरस्मने होणार आहे. ४ तारखेला संदल चढविली जाणार आहे तर ५ तारखेला ताजमध्ये चादरपोशी हा चादर व पंखे चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे. या काळात ताजमहाल पहिल्या दोन दिवशी दुपार ते सूर्यास्तापर्यंत व तिसर्‍या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पर्यटकांना निःशुल्क पाहता येणार आहे.

Leave a Comment