दुबई लायफाय वापरणारे पहिले शहर होणार

lifi
दुबईतील इंटरनेट युजर्स लवकरच डेटा ट्रान्स्फरसाठी नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीचा वापर करू लागणार आहेत. दुबईत जगात सर्वप्रथम लायफाय ही हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. वायफाय पेक्षा ही सेवा कितीतरी पटीने अधिक वेगवान आहे. यांत एलईडी बल्बच्या माध्यमातून इंटरनेट ट्रान्समिशन केले जाते.

या सेवेसाठी वापरल्या जाणार्‍या प्रत्येक हायएंड डिझाईन एलईडी बल्बची किंमत १ हजार डॉलर्स म्हणजे ६६ हजार रूपये आहे. दुबई स्मार्टसिटी योजनेअंतर्गत लायफायचा पहिला टप्पा या वर्षअखेर सुरू केला जात आहे. यात लाईट फिडेलिटी डाऊनलोड स्पीड सेकंदाला कित्येक गिगाबाईट इतका असतो. लॅबमध्ये हा स्पीड सेकंदाला २२२ गिगाबाईट मोजला गेला आहे. वायफायसाठी रेडिओ लहरींचा वापर केला जातो तर लायफायमध्ये एलईडी बल्ब वापरले जातात. त्यामुळे जेथे जेथे एलईडी बल्ब असतील अशा सर्व ठिकाणी म्हणजे रस्ते, घरे, कार्यालये, कार अशा चारीबाजूंनी इंटरनेट सेवा मिळते याचाच अर्थ तुम्ही चहूबाजूनी इंटरनेटने घेरलेले असता.

याचा एक दोष असाही आहे की लाईट भिंती भेदून पलिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे घरात एकच लायफाय कनेक्शन सर्व खोल्यांत सेवा देऊ शकत नाही.

Leave a Comment