गॅस सब्सिडी परतही मिळू शकणार

subsidy
आपण जर एलपीजी गॅससाठीची सब्सिडी सोडली असेल व ती आपल्याला परत मिळवायची असेल तरी तशी तरतूद केंद्र सरकारने केली असल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान यांनी सांगितले. ते म्हणले आपण सब्सिडी परत केल्यास १ वर्ष पूर्ण झाले नसेल तर ती परत सुरू व्हावी यासाठी क्लेम करता येईल. मुळातच पंतप्रधान मोदींनी ही गिव्ह इट अप योजना वर्षासाठी सुरू केली होती व योजनेला वर्ष पूर्ण झाले आहे.

२७ मार्चला २०१५ ला ही योजना सुरू झाली. या योजनेत दुसर्‍या वर्षीही ग्राहकाने सोडलेली सब्सिडी ऑटो रिन्यूव्हलची सुविधा नाही. त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना पुन्हा अर्ज करून सब्सिडी सोडावी लागेल. ज्यांना सब्सिडी परत हवी असेल त्यांनी रिन्यूव्हलसाठी अर्ज केला नसेल तर ती परत सुरू होणार आहे.

Leave a Comment