स्वस्त झाला लेनोवोचा ‘वाईब एस-१’

lenova
मुंबई : लेनोवो वाईब एस वन स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली असून हा स्मार्टफोन आता १२ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. एका ट्विटच्या माध्यमातून याबाबतची माहिती लेनोवो इंडियाने दिली. नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लेनोवो वाईब एस-१ स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चिंगवेळी या स्मार्टफोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये होती.

Leave a Comment