डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर वाढणार

credit-card
नवी दिल्ली – आता आरबीआय देशामध्ये कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकांवर दबाव टाकण्याच्या तयारीत असून याच्या अंतर्गत बँकांना त्यांच्याद्वारा जारी करण्यात आलेल्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डसाठी पीओएस मशीन लावावी लागणार आहे. असे झाल्यामुळे लोकांना क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक लहान दुकानांमधूनही कार्डच्या माध्यमातून खरेदी करण्याची सुविधा मिळण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे.

आरबीआयकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी बँकांसोबत सध्या चर्चा सुरू आहे. नवीन नियमांमध्ये बँकाद्वारा जारी करण्यात आलेल्या एकूण कार्डच्या आधारावर पीओएस लावण्यासाठी सांगण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील बँकांचे ७.८१ लाखापेक्षा जास्त पीओएस मशीन आहेत. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४.०६ लाख पीओएस मशीन लावली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी जवळपास ४७ लाख क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. तर खासगी बँकांनी १.३४ कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत.

Leave a Comment