असह्य उन्हाळ्यातही दिसा सदाबहार

hot-season
तळपता सूर्य, असह्य उन्हाळा अशावेळी फॅशनसाठी कोणत्या रंगाची निवड करावी असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पांढरा असे निश्चितच आहे. पण फॅशन तज्ञांच्या मते पांढरा हा उन्हाळ्यासाठी नेहमीच एव्हरग्रीन रंग असला तरीही अन्य कांही रंगांच्या कपड्यांनीही तुम्ही उठावदार दिसू शकता शिवाय पाहणार्‍यांच्या डोळ्यांनाही सुखकारक होऊ शकता. विशेषतः युवती व महिलावर्गासाठी या टीप्स दिल्या आहेत कांही फॅशन तज्ञांनी

साईस्ता फॅशन ब्रँडच्या सीओओ सोनल अब्रोल यांच्या मते पांढरा रंग जरूर वापरावाच पण त्याचबरोबर समुद्री हिरवा आणि निळ्या रंगाच्या शेडसही अगदी कडक उन्हातही साजर्‍या दिसतात. या रंगांच्या कपड्यांसोबत काँट्रान्स्ट रंगाच्या हँडबॅग व चप्पल्स तुमचे व्यक्तिमत्त्व अधिकच उठावदार करतील. ही काँबिनेशन्श तुमच्याकडे पाहणार्‍यांच्या नजरेलाही थंडावा देतील. त्याचबरोबर गुलाबी, स्ट्रॅाबेरी, पिवळा व हिरवा या रंगाच्या हलक्या शेडसही उन्हाळ्यात वापरण्यायोग्य आहेत.

अन्य एका फॅशनतज्ञाच्या मते उन्हाळ्यासाठी पांढरा कलर नेहमीच स्टायलीश लूक देतो. डोक्यापासून ते पायापर्यंत वापरायच्या कोणत्याही कपड्यात पांढरा रंग सहज वापरता येतो. पण त्याच्याबरोबरीनेच निळा, पिरोजी रंगाच्या अक्सेसरीज हटके लूक देतात. डेनिम्सवर पांढरे सुती टॉप, शर्ट, भुरकट रंगाच्या बॅग्ज आणि चपला किवा पांढर्‍या रंगाचे शॉर्ट स्कर्ट, पलाझो, स्लीम फिट पँट व त्यावर पेस्टल अथवा थोडे चमकदार रंगाचे टॉप्स तुम्हाला आणखीन आकर्षक बनवितील. प्रिटेड कापड्यात निळ्या रंगाचा समावेश आणखीनच हटके लूक देईल.

या तज्ञांच्या मते उन्हाळ्यासाठी फॅशन मंत्र हाच की तुमचा लूक साधा हवा. हा सीझन रंग, पॅटर्न यांचे विविध प्रयोग करून आणखी बहारदार बनविता येतो. सुती, विस्कोस, रेयॉन, क्रेप, लिनन या कापड प्रकारांबरोबरच इकत, टाय अॅन्ड डाय, ब्लॉक प्रिंट हे पारंपारिक डिझाईन्सही स्टाईल वाढविण्यात मोठा हातभार लावतात.

Leave a Comment