५ हजार कोटींवर ‘पतंजली’ ची उलाढाल

patanjali
हरिद्वार – अल्पावधीतच रिटेल क्षेत्रात योगगुरू रामदेवबाबांच्या ‘पतंजली’ने मुसंडी मारून अनेक कंपन्यांची झोप उडवली आहे. ‘पतंजली’ची वार्षिक उलाढाल ५ हजार कोटींवर गेली असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

४ वर्षांत ‘पतंजली’ च्या व्यवसायात ११०० टक्क्यांची वाढ झाली असून उत्पादनांची विक्री दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. २०१५ -१६ मध्ये दीडशे टक्क्यांची वाढ झाली असून एकूण ५ हजार कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचे सांगितले आहे. कंपनीच्या तूपाच्या उत्पादनाची विक्री १३०८ कोटींवर गेली आहे. तर दंतकांतीची विक्री ४२५ कोटींवर गेली आहे. बाजारात सकारात्मक प्रतिस्पर्धी म्हणून वातावरणनिर्मिती केली आहे. या व्यवसायात चांगली प्रगती केली असून कोणतीही कंपनी आम्ही खरेदी केली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment