५०० कर्मचा-यांना एलअँडटीने दिला नारळ

l&t
मुंबई – आपल्या विविध व्यवसायामधून ५०० कर्मचा-यांना इंजिनियरिंग कंपनी लार्सन ऍन्ड टुब्रोची नॉन बँकिंग आर्थिक कंपनी एलएंडटी फायनान्स होल्डिंगने घरचा रस्ता दाखविला आहे. कमी प्रमाणात आर्थिक व्यवसाय होत असल्याने खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

आतापर्यंत वेल्थ मॅनेजमेंट, ऑपरेशन्स, वितरण जाळे, कॉर्पोरेट मार्केटिंग, क्रेडिट हाऊसिंग फायनान्स टीमच्या लोकांचा राजीनामा मागण्यात आला आहे. त्यांना तीन महिन्यांचा पगार देण्यात येत आहे. मात्र बोनस आणि इतर रक्कम देण्यात आलेली नाही. कंपनीच्या अधिकाऱयांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिले. कंपनी व्यवसाय वाढविण्यासाठी आणि आर्थिक उत्पादने पोर्टफोलियोमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे. एलअँडटी फायनान्स होल्डिंगचा व्यवसाय मंद झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment