२०१७ पासून पॅनिक बटण असेल तरच मोबाईल विक्रीला परवानगी

panic-button
नवी दिल्ली- भारतात विकल्या जाणा-या सर्व मोबाईल फोन्समध्ये एक जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आले असून हे पॅनिक बटण अडचणीत असताना तात्काळ इर्मजन्सी कॉल करता यावा यासाठी असणार आहे.

त्यानंतर सर्व मोबाईलमध्ये एक जानेवारी २०१८ पासून दिशादर्शक जीपीएस यंत्रणेची सुविधाही बंधनकारक करण्यात आल्याची माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती झाली आहे. पॅनिक बटण खास करुन महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये बंधकारक करण्यात आले आहे. एक जानेवारी २०१७ पासून पॅनिक बटण नसेल तर, विक्रेत्याला मोबाईल फोनची विक्री करता येणार नाही. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनिक बटण दाबल्यानंतर संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचा संदेश काही लोकांपर्यंत जाईल.

Leave a Comment