मोटो जी टर्बो विराट कोहली एडिशन लाँच

fanbox
भारतात मोटोरोलाने मोटो जी टर्बोची नवी विराट कोहली एडिशन लाँच केली आहे. या फोनचे उद्घाटन विराट कोहलीच्याच हस्ते करण्यात आले असून हा फोन ग्राहकांना विराटची प्रतिमा व विराटच्या फॅन बॉक्ससह मिळणार आहे. फोनची किमत आहे १६९९९ रूपये. फॅनबॉक्स मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध केली जाणार आहे.

फॅनबॉक्स हे पहिलचे फॅन क्लब मेंबरशीप कंन्सेंट असून कॉर्नरस्टोन स्पोर्ट कंसल्टंट व प्रिवीप्लेक्स यांनी संयुक्तपणे ते लाँच केले आहे. ही बॉकस ग्राहकाला १ वर्षाच्या सबस्क्रिप्शनसह मिळणार आहे. यामुळे युजरला थेट विराट कोहलीशी जोडण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याचे अॅपही उपलब्ध करून दिले जात असून या अॅपचे डिझाईन खास फॅन्ससाठी केले गले आहे. त्या सोबत विराटच्या सहीची ऑटोमिनिएचर बॅट व त्याच्याच सहीचे वेलकम लेटरही मिळणार आहे.

Leave a Comment