भारतात लॉंच झाली ‘जॅग्वार लॅंड रोवर’ची ‘एसयूवी इवोक’

jaguar
मुंबई – आपली नवी कोरी रेंज रोवर इवोक लोकप्रिय कार निर्माती कंपनी जॅग्वार लॅंड रोवरने भारतात लॉंच केली. या नव्या गाडीची किंमत ४७.१ लाख रूपये ते ६३.२ लाख रूपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्शक डिझाईनचा पूरेपूर वापर केलेली ही नवी गाडी ग्राहकांच्या किती पसंतील उतरते याबाबत उत्सुकता आहे.

याबाबत जेएलआरचे भारतातील अध्यक्ष रोहित सुरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, उद्योग क्षेत्रात ही नवी गाडी कार एक मैलाचा दगड ठरली आहे. इवोकच्या लॉंचिंगपूर्वीच बाजारात १२५ गाड्यांचे बुकींग झाल्याचा दावा सुरी यांनी केला आहे. त्यामुळे जेएलआरच्या या नव्या ब्रॉंडबाबत ऑटोमोबाईल विश्वातून उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे.

केवळ २.२ लीटर डिझेल इंजिनसोबत फेसलिफ्ट रेंज रोवर इवोक मार्केटमध्ये उतरली आहे. या गाडीचे इंजिन १८७ एचपीचे असून, ते २४० एनएमचे टॉर्क जनरेट करते. नवी कोरी जाग्वार लॅंड रोवर रेंज रोवर इवोकचा चार वेरियंट एसई, एचएसई म्हणजेच एचएसई डायनामिकचे आहे. विशेष म्हणजे ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन वर्षांचा सर्विस प्लान किंवा तीन वर्षे किंवा १ लाख किलोमीटरची वॉरंटी दिली जाणार आहे. मुंबईतील एका शोरूममध्ये या आलिशान गाडीची किंमत ४७.१ लाख रूपये इतकी सांगण्यात आली आहे.

Leave a Comment