चिनी दूध, दुग्धजन्य पदार्थ व मोबाईल आयातीवर भारतात बंदी

china-milk
सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे चीनमधून दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच कांही ठराविक मोबाईल भारतात आयात करण्यावर बंदी घातली गेली असल्याचे वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.

सीतारामन म्हणाल्या की चीनमधून आयात केले जात असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ सुरक्षा नियमांच्या मानकांनुसार नाहीत असे दिसून आले आहे. त्या मुळे या पदार्थांच्या तसेच आंतरराष्ट्रीय मोबाईल स्टेशन उपकरण ओळख संख्या म्हणजे आयएमईआय नंबर नसलेल्या मोबाईल्सच्या आयातीवर भारतात बंदी घातली गेली आहे. या आयएमईआयमुळे मोबाईल्सचा ट्रेस घेणे शक्य होते व त्यामुळे हा नंबर आवश्यक असतो. अनेक मोबाईल उपकरणांवर असा नंबर नसतो त्यामुळे हे मोबाईलही यापुढे आयात करता येणार नाहीत.

Leave a Comment