घरांच्या किंमती कमी करा: रघुराम राजन

Raghuram-Rajan
मुंबई: रिझर्व बँकेने व्याजदर कमी केल्याने आता बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांनी घरांच्या किंमती कमी कराव्या. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना घरे घेणे शक्य होईल आणि बांधकाम व्यवसायालाही गती प्राप्त होईल; असे आवाहन रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले.

यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत राजन बोलत होते. देशाच्या विकासासाठी बांधकाम रस्त्यांचे असो वा घरांचे; त्याला अत्यंत महत्व आहे; असे नमूद करतानाच त्यांनी जमीन ताब्यात घेण्यापासून घर विकण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.

रिझर्व बँकेने या वर्षीच्या जानेवारीपासून आतापर्यंत व्याजदरात दीड टक्क्याने कपात केली आहे. यापुढेही व्याजदरात कपात होत राहील; असा विश्वास व्यक्त करून त्यामुळे व्यवहारांना गती येईल आणि घरांच्या खरेदीमध्ये वाढ होईल; असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला. मात्र त्यासाठी घरांच्या किंमती रास्त असणे आवश्यक आहे; असेही ते म्हणाले.

Leave a Comment