शाओमीची तीन नवी उत्पादने बाजारात

Water-Purifier
बीजिंग: शाओमी या इलेक्ट्रॉनिक उत्पादने विकसित करण्याऱ्या चिनी कंपनीची तीन नवी स्मार्ट उत्पादने बाजारपेठेत आली आहेत. त्यामध्ये वॉटर प्युरीफायर, ब्ल्यू टूथ स्पीकर आणि राउटर या सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांचा समावेश असला तरीही त्याची काही वैशिष्ट्य इतरांपासून त्यांचे वेगळेपण सिद्ध करतात.
एमआय वॉटर प्युरीफायर-२ यामधून केवळ दोन मिनिटात १ लीटर पाणी शुद्ध केले जाते. या उपकरणातून ०.०००१ मायक्रॉन एवढ्या छोट्या कणांना शोधून त्यांना पाण्यापासून दूर करण्यात येतो. मात्र त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे या प्युरीफायरला ‘वाय फाय’च्या सहाय्याने अँड्रॉईड अथवा आयओएस उपकरणांशी जोडता येते. त्याद्वारे हे उपकरण पाण्याच्या दर्जाचे, शुद्धतेचे प्रमाण दाखविते. या प्युरीफायरचे वजन ११.८ किलो असून किंमत ३१० डॉलर आहे.
Speaker
‘एमआय ब्ल्यू टूथ स्पीकर’कंपनीने बाजारात आणला असून त्यात १ हजार २०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून त्याद्वारे ७ तासांपर्यंत सलग संगीताचा आनंद घेता येतो; असा कंपनीचा दावा आहे. या स्पीकरची किंमत २० डॉलर आहे.
Router
याशिवाय कंपनीने एमआय राउटर-३ बाजारात आणले असून त्याला ४ अँटीना जोडण्यात आले असल्याने सिग्नलचा वेग कित्येक पटीने वाढत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या उत्पादनाची किंमत सुमारे २३ डॉलर आहे.

Leave a Comment