महिंद्रा स्कॉर्पिओची अॅडव्हेंचर एडीशन सादर

Scorpio
मुंबई: महिंद्रा आणि महिंद्राच्या स्कॉर्पिओ या लोकप्रिय गाडीची ‘अॅडव्हेंचर एडीशन’ कंपनीने सादर केली असून ‘एस १०’ प्रकारातील ही एडीशन मर्यादित असल्याने त्याच्या केवळ १ हजार गाड्या बाजारात आणल्या जाणार आहेत. या गाडीची मुंबई एक्स शो रूम किंमत १३ लाख ७ हजारांनी सुरू होत आहे.

या गाडीमध्ये स्कॉर्पिओच्या जुन्या वैशिष्ट्यांसह ‘गनमेटल अॅलॉय व्हील्स, इंडीकेटर्सच्या बरोबरीने ‘ओआरव्हीएम’, स्मोक्ड टेललँप्स, मिस्ट सिल्व्हर आणि व्हाइट डुअल-टोन एक्सटीरियर एडवेंचर ग्राफिक्स या नव्या सुविधा या गाडीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या गाडीच्या आंतररचनेतही काही नव्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये निळ्या ‘फॅब्रिक इंसर्ट’सह फॉक्स लेदर सीट कव्हर्स, स्टिअरिंग व्हील आणि गिअर लीव्हरवर लेदर कव्हर, रिअर व्ह्यू कॅमेरा या सुविधांचा समावेश आहे.

या मर्यादित एडिशनमाढेल गाड्या टू व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहेत. २.२ लीटर एम हॉक आणि नवीन १.९ लीटर एम हॉक अशा दोन प्रकारच्या इंजिन असलेल्या या गाड्यांच्या दोन्ही प्रकारच्या इंजिनांची क्षमता १२० बीएचपी आणि टॉर्क २८० एनएम असणार आहे.

टू व्हील ड्राईव्ह गाडीची मुन्बीतील एक्स शो रूम किंमत १३ लाख ७ हजार २२९ रुपये असणार आहे; तर तीच दिल्ली येथे १३ लाख ६२ हजार २६० असणार आहे. फोर व्हील ड्राईव्हच्या गाडीची मुन्बीतील किंमत १४ लाख २४ हजार १२ रुपये; तर दिल्ली येथे १४ लाख ८० हजार २५९ एवढी असणार आहे.

Leave a Comment