पीएफ खातेदारांना झटका; व्याजदरात कपात

epfo
नवी दिल्ली: भविष्य निर्वाह निधीचे खाते असणा-यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिलेल्या निर्णयानुसार आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या डिपॉझिटवर ८.७ टक्के व्याजदर दिला जाणार आहे. ३१ मार्च २०१५ रोजी संपलेल्या २०१५-१६ या आर्थिक वर्षात पीएफ खाते धारकांना ८.७ टक्के एवढा व्याजदर मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी माहिती दिली

हा व्याजदर २०१५-१६ पासून लागू होणार आहे. त्यावर आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संमती दिली आहे. ईपीएफचा २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी पीएफवरील व्याजदर ८.७५ टक्के होता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे देशभरात जवळपास ४ कोटी सभासद असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment