जगातील दहा गाजलेल्या महिला हॅकर्स

joanna1
संगणक युगात हॅकर्स हे प्रकरण फारच नांदतेगाजते ठरते आहे. अर्थात जेव्हा जेव्हा हॅकर असा उल्लेख होतो, तेव्हा मास्कने चेहरा झाकलेल्या माणसांचे फोटो समोर येतात. मात्र या क्षेत्रातही महिला मागे नाहीत. या क्षेत्रात आजघडीला अनेक महिला हॅकर्स कार्यरत आहेत. त्यातील कांही लोकप्रिय आहेत तर कांही त्यांच्या कृत्यांनी बदनाम झालेल्या आहेत. सौंदर्याबाबतीत म्हणाल तर या हॅकर्स मॉडेल्सनाही मागे टाकतील अशा देखण्या आहेत. अशाच कांही गाजलेल्या महिला हॅकर्सची माहिती खास आमच्या वाचकांसाठी

१)नताशा ग्रिगोरी ही महिला हॅकर्सची नेता म्हणता येईल कारण ही आद्य महिला हॅकर म्हणून ओळखली जाते. हॅकिंगचे क्षेत्र फारसे फळफळलेले नव्हते तेव्हाच ती प्रसिद्धीच्या झोतात होती. सुरवातीला हॅकर म्हणून ओळख मिळविलेल्या नताशाने त्यानंतर जन्मभर चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात काम करून लोकांच्या हृदयात स्थान मिळविले होते.२००५ साली तिचा मृत्यू झाला.

२)जोएन्ना रटस्कोव्हस्कि ही अशीच एक चांगल्या कामासाठी गाजलेली एथिकल हॅकर. आपल्या ज्ञानाचा वापर तिने सरकारी मदतीसाठी केला असून लो लेव्हल सिक्युरिटी रिसर्च व मालवेअर प्रोग्रॅमसाठी ती प्रसिद्ध आहे. तिने शोधलेले ब्ल्यू पिल तंत्रज्ञान अफलातूनच आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणताही संगणक व्हर्च्युअल मशीनमध्ये बदलता येतो.

३)रवाना अॅल्डर हिची ओळख टॉप हॅकर्समधली एक अशी आहे. हॅक डिटेक्टींग सिस्टीम डेव्हलपर असलेल्या या हॅकरला डिफकॉन हॅकिंग क्षेत्रातल्या महापरिषदेत प्रेझेंटेशन देण्याचा मानही मिळाला आहे. मात्र तिचा आक्षेप असा की तिला तिच्या कामावरून ओळखले जावे. महिला हॅकर व पुरूष हॅकर हा भेद तिला मान्य नाही. त्यामुळे महिला हॅकर अशी तिची ओळखही तिला मान्य नाही. हॅकिंगबरोबरच मार्शल आर्टचे कौशल्यही तिच्या अंगी आहे.
hacker-2

४)एडिएना कूक- एखाद्या मॉडेलला लाजवेल अशी सौंदर्यवती एडिएना हॅकर बनली ती वेगळ्याच कारणाने. तिचे कांही आक्षेपार्ह फोटो तिच्या मित्राने पैसे मिळविण्याच्या उद्देशाने इंटरनेटवर टाकले. ते पाहताच तिने सायबर सेलकडे तक्रार वगैरे करण्याची भानगड न ठेवता स्वतः ही साईट हॅक करून फोटो डिलीट केले. इतकेच नव्हे तर आक्षेपार्ह पोझमधले अन्य मुलींचे फोटोही डिलिट करून टाकले व या प्रकारे तिचा हॅकींग क्षेत्रात प्रवेश झाला.

५)अॅन चॅपमन- अमेरिकाविरोधात हॅकींग केल्याचा आरोप असलेली ही युवती रशियन असून मास्को विद्यापीठाची पदवीधर आहे. तिला तिच्या साथीदारांसह अमेरिका विरोधातील हॅकींग प्रकरणात २० जून २०१० ला न्यूयाॅर्क येथे अटक झाली होती. त्यापूर्वी एफबीआयनेही तिला दोन वेळा अटक केली होती. ती खरी चर्चेत आली ३ जुलै २०१३ ला. या दिवशी तिने आपला व्हिडीओ इंटरनेटवर टाकून अमेरिकेसाठी व्हिसल ब्लोअर ठरलेल्या एडवर्ड स्नोडेनला लग्नासाठी प्रपोज केले होते.

६)गीगाबाइट या टोपण नांवाने ओळखल्या जाणार्‍या हॅकरचे खरे नांव आहे किम वॅनव्हेक. कोकोनट ए, शार्प ए, सहाय ए असले खतरनाक संगणक व्हायरस बनविणार्‍या गीगाबाईटला ब्रसेल्स येथे अटक केली होती मात्र ती जामीनावर सुटली होती. हे व्हायरस युजर्सची माहिती चोरणे व नष्ट करण्यासाठी वापरले जातात. त्यानंतर तिला ३ वर्षे तुरूंगवासही झाला आहे.
hacker1

७)ज्यूड मिल्हान ही मूळची अमेरिकन पण चीनच्या शांघायमध्ये राहते. हॅकींग मास्टर अशीच तिची ओळख आहे.इतकेच नव्हे तर ती हॅकींगचे प्रशिक्षणही देते. युजरचे अॅड्रेस चेंज करणे, पासवर्ड शोधणे अशी हॅकींगची बेसिक्स ती शिकविते. हॅकींग विषयात तिने खूप लेखन केले आहे. ही सॉफट क्रॅकर या नावानेही परिचित आहे.

८)क्रिस्टीना स्वेचीन्स्काया- न्यूयार्क विद्यापीठाची ही पदवीधर खोटे पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अडचणीत आली. ट्रोझन हॉर्सचा वापर करून तिने ५ अमेरिकी बँकांची अकौंट हॅक केली आणि ३० लाख डॉलर्सची चोरी केली असाही तिच्यावर आरोप आहे.

९)शिओ टीआन- ही चीनी हॅकर. चायना गर्ल्स सिक्युरिटी टीममधून तिची ओळख झाली आहे. २२०० सदस्य असलेला हा सर्वात मोठा चिनी महिला हॅकर ग्रुप आहे. याच गटाने चीनमध्ये गुगल कंपनीला चांगलेच हैराण केले होते, इतके की गुगलने चीनमधून त्यांची सेवा परत घेतली. या गटाने अन्य बड्या हॅकर ग्रुपबरोबर टायअप केले आहे.

१०) यिंग क्रॅकर- महिला हॅकर ग्रुपमधील ही सर्वात सुंदर हॅकर यादीत अग्रस्थानी आहे. शांघायमध्ये ती हॅकींगचे क्लासेस घेते. सॉफ्टवेअर क्रॅक करण्यात ती मास्टर आहे. तिचा ऑनलाईन फोरमही आहे. चीनी हॉटी हॅकर अशीही तिची ओळख आहे.

Leave a Comment