केदारनाथ यात्रेकरूंसाठी सज्ज

kedar
यंदाच्या वर्षी केदारनाथ यात्रेकरूंसाठी अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या असून केदारनाथ यात्रेकरूंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. येत्या अक्षयतृत्तीयेला म्हणजे ९ मे रोजी उत्तराखंडातील चार धाम यात्रेकरूंसाठी खुले होत आहेत. उत्तराखंड राज्याच्या अर्थकारणाचा प्रमुख स्त्रोत असलेली ही चारधाम यात्रा दोन वर्षांपूर्वी आलेल्या महाप्रलयामुळे अडचणीत आली होती. निसर्गप्रकोपात हा यात्रा मार्ग जवळजवळ नष्ट झाला होता. मात्र उत्तराखंड सरकारने या चारी पवित्र ठिकाणचे मार्ग नव्याने तयार केले आहेत.

या यात्राधामांसाठी रस्त्यांचे रूंदीकरण, डांबरीकरण केले गेले आहेच पण केदारनाथाची २१ किमीची पायवाट पक्क्या स्वरूपात बांधली गेली आहे. जागोजागी यात्रेकरूंना विश्रांती घेण्यासाठी निवारे उभारले गेले आहेत तसेच आरोग्य पथके, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज केली गेली आहे. प्रत्येक यात्रेकरूला संपर्कात ठेवण्यासाठी अत्याधुनिक संपर्क यंत्रणाही उभारली गेली आहे त्यामुळे कोणत्याही आपत्तीत प्रशासन यात्रेकरूंची काळजी घेऊ शकणार आहे. रस्ते, पुलांची कामे पूर्ण झाली आहेत.

यंदाच्या यात्रेसाठी महाराष्ट्र व गुजराथेतून भाविकांचा प्रतिसाद सर्वाधिक असल्याचेही समजते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांच्या संख्येत चौपटीने वाढ होत असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment