सहा डोअर्सची ऑडी ए ८ एल

udi-a8-l
आपल्या एका युरोपियन ग्राहकासाठी ऑडी ने सहा दरवाजांची ए एट एल ही सेदान आणखी मोठी केली आहे. सहा दरवाजे असलेल्या या कारची लांबी सुमारे २० फूट आहे. या कारसाठी पूर्णपणे अॅल्युमिनियमचा वापर केला गेला आहे. तसेच ७.९ फुटाचे ग्लास पॅनलही तिला बसविले गले आहे. ३.० लिटरचे टीएफएसआय पेट्रोल इंजिन दिले गले आहे व ते आठ स्पीड अॅटोमेटिक गिअर बॉक्सशी जोडलेले आहे.

० ते १०० किमीचा वेग ही कार ७.१ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५० किमी. या कारचे इंटिरीयरही टॉप क्वालिटीचे असून सीटसाठी हाय क्वालिटी मटेरियलचा वापर केला आहे. या कारमधून सहा जण आरामात प्रवास करू शकतात. सहा दरवाजे असलेल्या या कारच्या दुसर्‍या व तिसर्‍या रो मध्ये इलेक्ट्रीकली अॅडजस्टेबल सीट दिल्या गेल्या आहेत तसेच तिसर्‍या रोमध्ये सेंसर कंसोल दिले गले आहे. मनोरंजनाच्या दृष्टीनेही परिपूर्ण सुविधा असलेल्या या किंग साईज कारचे व्हर्जन प्रथमच सादर केले गेले आहे. कारची किंमत आहे १.१५ कोटी रूपये.

Leave a Comment