रघुराम राजन, जबाबदारी मोठी- पगार मात्र बेताचा

rajan
रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या वेतन माहिती अहवालानुसार बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर असलेली जबाबदारी उपअर्थमंत्र्यांच्या तोडीची असली तरी वेतनात मात्र ते फारसे पुढे नाहीत असे दिसून आले आहे. या पदाचा अधिकार मोठा आहे, पोझिशन मोठी आहे, देशाचे चलन त्यांच्या सहीचे आहे तरी त्यांच्यापेक्षाही अधिक वेतन घेणारे तज्ञ रिझर्व्ह बँकेत आहेत.

राजन यांना राहण्यासाठी दक्षिण मुंबईतील कार्मिशियल रोड या उच्चभ्रू उद्योगपतींची निवासस्थाने असलेल्या रस्त्यावरच सरकारी बंगला आहे. मात्र त्यांचे पद कॅबिनेट सचिवाच्या पदाइतकेच आहे.३० जून २०१५ मध्ये राजन यांना दरमहा १.९९ लाख रूपये पगार मिळाला आहे. आयआयएस पदवीधरही इतका पगार मिळवितात. राजन यांच्या हाताखाली काम करणारे गोपालकृष्णन सीताराम यांना दरमहा ४ लाख, अन्नामलाई यांना दरमहा २.२० लाख तर व्ही कंडास्वामी यांना दरमहा २.१० लाख रूपये पगार मिळाल्याचेही या अहवालावरून दिसले आहे. असेही सांगितले जात आहे की रिझर्व्ह बँक गर्व्हनरचा पगार वाढविण्याच्या विचारात आहे.

Leave a Comment