गुगल, फेसबुक मुख्यालयाला पुराचा धोका

facgu
सर्व जगापुढे सध्या जागतिक तापमान वाढीची समस्या उग्र रूप धारण करून समोर ठाकली असताना सिलीकॉन व्हॅलीतील गुगल, फेसबुक, सिस्को सारख्या कंपन्यांच्या मुख्यालयाना पुरामुळे नुकसान होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. सॅन फ्रान्सिस्को खाडीतील समुद्र पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ हे या धोक्यामागचे मुख्य कारण सांगितले जात आहे.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार समुद्र पाण्याच्या पातळीतील वाढीमुळे येणार्‍या पुराचा सर्वाधिक धोका फेसबुकच्या नव्या कँपसला आहे. सुमारे साडेचार लाख चौरस फुट जागेतील व नऊ एकराचे रूफ टॉप गार्डन असलेले हे कँपस खालच्या स्तरावर बांधले गेले आहे. कॅलिफोर्निया खाडी संरक्षण व विकास आयोगातील वरीष्ठ लिडी लोव यांच्या म्हणण्यानुसार जमिनीच्या खालच्या स्तरातील बांधकामामुळे फेसबुकला पुराचा धोका सर्वाधिक आहे. त्यामानाने गुगलचे मुख्यालय माउंदेट व्ह्यू व टेक्नॉलॉजी कंपनी सिस्कोचे मुख्यालय सेन जोन्स येथे थोडी उंचावर आहेत. त्यामुळे त्यांना पुराचा धोका थोडा कमी आहे. मात्र अंटार्टिक बर्फ वितळले तर पाणी पातळीत वाढ होईल तेव्हा या मुख्यालयांनाही पुराचा फटका बसू शकेल. असा पूर आलाच तर १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment