कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर

KONKAN-RAILWAY
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून कोरेवर धावणाऱ्या पावसाळी अर्थात मान्सून गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते ऑक्टोबरपर्यंत लागू राहील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली. या वेळापत्रकानुसार १६ एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेनच्या सुरुवातीच्या स्थानकातून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळ्यात ट्रेन वेळेवर धावाव्यात यासाठी हे वेळापत्रक लागू केले जाते.

गाडी नं. गाडीचे नाव आधीची नवीन
वेळ वेळ
१०१०४ मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेस ०९.३० ०८.३०
११००४ सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस १८.१० १७.३०
१२६१७ एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला १३.०५ १०.४५
१२०५२ मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस १४.३० १२.००
१२६२० मंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्स. १४.४० १२.५०
१०११२ मडगाव-सीएसटी कोकणकन्या १८.०० १६.४५
२२९०७ मडगाव-हापा एक्सप्रेस १०.४० ०७.००
१२७४१ वास्को-पटणा एक्सप्रेस १९.०५ १८.००
१०२१५ मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेस २१.३० २१.००
१२४४९ मडगाव गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस ११.२० १०.००
११०८६ मडगाव-एलटीटी डबल डेकर ०६.०० ०५.३०
५०१०१ रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर ०३.२० ०२.२०
१२१३४ मंगलोर जंक्शन-सीएसटी एक्सप्रेस १४.०० १६.४५
१६५२४ कारवार-बंगळुरु एक्सप्रेस १४.४० १४.५५
५६६४१ मडगाव-मंगलोर पॅसेंजर १३.०० १४.००
५०१०२ मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर १९.१० २०.००

Leave a Comment